आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - ‘असावी सुंदर पेट्रोलमुक्त कार’ ही कल्पना चॉकलेटच्या बंगल्यासारखीच स्वप्नवत वाटेल; मात्र ती सत्यात आणण्याचा प्रयत्न जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी सौरऊर्जा व पवनऊर्जेवर असे पेट्रोलमुक्त कार मॉडेल बनविले आहे. एक वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांनी छोट्या आकाराच्या या मॉडेलची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली आहे. या मॉडेलचे नाव आहे ‘रिनीव्हेबल एनर्जी बेस हायब्रिड कार’.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेले राहुल पाटील, अमृता पाटील, राजलक्ष्मी पाटील, रचना जाधव या चार विद्यार्थ्यांनी हे मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल बनविताना त्यांना जळगावचेच महेद्रसिंग पाटील यांचे कारविषयक तांत्रिक सहकार्य लाभले.
असे आहे मॉडेल : या मॉडेलमध्ये दोन बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. एक बॅटरी सौरऊर्जेवर, तर दुसरी बॅटरी पवनऊर्जेवर आहे. एकावेळी एक बॅटरी चार्ज होईल, तर दुस-या बॅटरीवर कार धावत राहील. सौरऊर्जेसाठी सोलर पॅनल बसविले आहे, तर पवनऊर्जेसाठी कारवर एक पंखा असेल. ज्या वेळी सौरऊर्जेवर कार धावेल, त्या वेळी कारवरील पंखा वेगाने फिरेल. त्यातून येणारी ऊर्जा बॅटरीत स्टोअर होईल. ज्या वेळी उष्ण तापमानात कार असेल त्या वेळी सौरऊर्जा स्टोअर होईल. एक बॅटरी डिस्चार्ज झाली तर दुस-या बॅटरीवर कार आपोआप धावेल. त्यासाठी दोन व्होल्टेज मीटर बसविण्यात आले आहे, ज्यामुळे बॅटरी किती चार्ज झाली याची माहिती होते.
काय आहेत फायदे?
* पेट्रोलमुक्त असल्याने खिशाला झळ बसणार नाही. पर्यावरणास घातक धूरही फेकला जाणार नाही.
* पावसाळ्यात सौरऊर्जा मिळाली नाही तरी पवनऊर्जेवर धावू शकेल.
* 40 ते 50 च्या वेगावर पवनऊर्जा बॅटरीत स्टोअर करता येईल.
* पेट्रोल, डिझेलवरील वाहने ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तूपासून 100 मीटर दूर उभी करावी लागतात. मात्र, ही कार पूर्णत: प्रदूषणमुक्त असल्याने ती थेट 100 मीटरच्या आतही पार्क करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.