आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon District Bank Election Ekanthh Khadse Panel Win

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राेहिणी खडसेंचे नाव आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पालकमंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील ‘सहकार’ पॅनलची सत्ता आली आहे. या निवडणुकीत २१ पैकी १८ जागा खडसेंच्या पॅनलने राखल्या, तर ‘लाेकमान्य’ला तीन जागा मिळाल्या. एकहाती सत्ता आल्याने बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी राेहिणी खडसेंचे नाव जवळपास निश्चित झाले असून, नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे.

दिग्गजांना उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार असल्याने खडसेंच्या पॅनलमधील काही मंडळींनी निकाल लागताच उपाध्यक्षपदासाठी समर्थक संचालकांची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खडसेंच्या नेतृत्वातील सहकार पॅनलपुढे एेनवेळी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पुरस्कृत लाेकशाही शेतकरी पॅनलचा धुव्वा उडाला. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीतील दिग्गज मंडळींनी खडसेंच्या नेतृत्वात बँकेची निवडणूक लढवली. पॅनलला अपेक्षित यश आल्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वीच खडसे समर्थकांकडून अध्यक्षपदासाठी राेहिणी खडसेंचे नाव पुढे आले हाेते. आता निवडणुकीच्या निकालानंतर खडसे समर्थक संचालकांनी अध्यक्षपदासाठी राेहिणी खडसेंचे नाव लावून धरले आहे.

"दिव्य मराठी'चा अंदाज ठरला खरा
जिल्हाबँ केच्या निवडणुकीत मतदानानंतर "दिव्य मराठी'ने मतदारांशी बाेलून संभाव्य संचालक मंडळाबाबत एक्झिट पाेल तयार केला हाेता. यात सहकार पॅनल १७, तर विराेधी पॅनलला चार जागा मिळणार असल्याचा अंदाज दिला हाेता. त्यानुसार सहकार पॅनलने १८, तर लाेकमान्य शेतकरी पॅनलने तीन जागांवर विजय मिळवला आहे. "दिव्य मराठी'च्या एक्झिट पाेलनुसार भडगाव, जामनेर, पाचाेरा येथे साेसायटी मतदारसंघात एकतर्फी लढत झाली. उमेदवार किती मतांच्या फरकाने निवडून येथील? याबाबत वर्तवलेल्या अंदाजावर निकालानंतर शिक्कामाेर्तब झाले आहे.

बैठकीत निर्णय
अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच संचालकांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. -एकनाथखडसे, सहकार पॅनलचे नेते

अध्यक्षपद स्वीकारणार
मी सहकारात नवीन नाही. पॅनलच्या संचालकांनी जबाबदारी दिली तर अध्यक्षपद स्वीकारण्याची तयार आहे. - राेहिणीखडसे, खडसे यांच्या कन्या