आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेवर खडसेंचे ‘सहकार’, २१ पैकी १७ जागांवर विजयाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानानंतर ‘दिव्य मराठी’ने मतदारांचा काैल जाणून घेतला. या एक्झिट पाेलमध्ये खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलला १७, तर विराेधातील खासदार जैन यांच्या ‘लाेकमान्य’ पॅनलला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतदार आणि उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून हा एक्झिट पाेल तयार केला आहे.

साेसायटी मतदारसंघातील जामनेर, भडगाव आणि पाचाेरा मतदारसंघात एकतर्फी लढत हाेईल. जामनेरमध्ये गिरीश महाजन हे ५० ते ६० पाचाेर्‍यात किशाेर पाटील हे २४ ते २८ मतांच्या फरकाने विजयी हाेतील. तसेच भडगाव येथे नानासाहेब देशमुख यांना ४०पैकी ३२ ते ३५ मते मिळण्याचा अंदाज आहे. चाळीसगावमध्ये अटीतटीची लढत असून, ते मतांनी राजीव देशमुखांचा विजय हाेऊ शकताे. बाेदवडमध्ये अ‍ॅड.रवींद्र पाटील यांचा ते मतांनी विजय हाेईल. रावेरमध्ये ते मतांनी विजयी हाेऊन अरुण पाटील यांची संचालकपदी वर्णी लागू शकते. अमळनेरमध्ये ते मतांनी अनिल पाटील यांच्या विजयाचा अंदाज आहे. भुसावळमध्ये संजय सावकारे हे ते मतांनी िवजयी हाेण्याची शक्यता आहे.विराेधकांच्या तुलनेत या निवडणुकीचे मायक्राे प्लॅनिंग केले असल्याने ‘सहकार’ पॅनलच्या राखीव प्रवर्गातील सर्व जागा निवडून येतील, असा अंदाज ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

जिल्हा बंॅकेचे संभाव्य संचालक मंडळ असे : सहकार पॅनल- किशाेरपाटील (पाचाेरा), गिरीश महाजन (जामनेर), संजय सावकारे (भुसावळ), नानासाहेब देशमुख (भडगाव), अ‍ॅड.रवींद्र पाटील (बाेदवड), राजीव देशमुख (चाळीसगाव), अनिल भाईदास पाटील गणेश नेहेते (यावल), यापूर्वीच बिनविराेध निवड झालेेले एकनाथ खडसे (मुक्ताईनगर), संजय पवार (धरणगाव), चिमणराव पाटील (पाराेळा), सुरेश भाेळे (जळगाव) अमाेल चिमणराव पाटील (एरंडाेल).

लाेकमान्य शेतकरी पॅनल- अ‍ॅड.रवींद्रपाटील (बाेदवड), राजीव देशमुख (चाळीसगाव), अरुण पाटील (रावेर) बिनविराेध झालेले डाॅ.सुरेश पाटील (चाेपडा). राखीवमतदारसंघ -(सर्व ‘सहकार’पॅनल), महिलाराखीव -राेहिणीखडसे तिलाेत्तमा पाटील. , आेबीसीए.टी.पाटील,इतरसंस्था गुलाबरावदेवकर, अनुसूचितजाती-जमाती -प्रा.चंद्रकांतसाेनवणे, विमुक्तजाती-भटक्या जमाती- वाडीलालराठाेड.

आज मतमाेजणी
जिल्हा बँकेसाठी गुरुवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी वाजेपासून मतमाेजणी प्रक्रियेला प्रारंभ हाेईल. सकाळी ११.३० वाजता अमळनेर तालुक्यापासून मतमाेजणीला प्रारंभ हाेईल. १२ वाजता मतमाेजणीची पहिली फेरी संपेल.

दिव्य मराठी एक्झिट पाेल
पॅनलनिहाय संचालक
सहकार पॅनल - १७
लोकमान्य शेतकरी पॅनल - 4
भाजप - 9
राष्ट्रवादी - 7
शिवसेना - 4
काँग्रेस - 1