आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon District Chopda Car Accident Student Dead

अपघातात विद्यार्थी ठार; संतप्त जमावाच्या मारहाणीत कारचालकाचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - भरधाव जाणार्‍या कारने शालेय विद्यार्थ्यास उडविल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने केलेल्या मारहाणीत कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी चोपडा तालुक्यातील हातेड येथे घडली.

गुजरातमधील शेख सलीम शेख करीम (वय 55) हे आपल्या कुटुंबासह बोदवड येथे आपल्या पुतणीच्या लग्नासाठी जात होते. चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड गावाजवळ भरधाव जाणार्‍या फोर्ड फिगो (जीजे 16 एपी 4600) गाडीने शेतातून सायकलने जाणार्‍या मयूर सुनील सनेर (वय 16) याला धडक दिली. त्यात तो फेकला गेला आणि त्याची सायकल गाडीच्या चाकात अडकली. या अपघातात मयूर जागीच ठार झाला. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली आणि कारचालक शेख सलीम (रा.नेत्रन, ता.कालिया, जि.भरुच) याला पकडून बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारमधील जहिर खॉ अमिर खॉ (37), जाबीर सलीम कुरेशी, इंदारबी शेख सलीम, शेख समद शेख करीम कुरेशी (वोदवड) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चोपडा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी जबीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभर ते दीडशे जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुनील गोसावी करीत आहेत. मयत मयूर सनेर हा शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने शेतीची कामे करून तो शिक्षण घेत होता.