आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon District Cooperative Bank News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा बँक घोटाळा; गुन्हा दाखलच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाबँकेतील विविध पाच आर्थिक घोटाळ्यासंदर्भात आर्थिक जबाबदारी निश्चित केलेल्या संचालकांवर फैजदारी गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. गुन्हा दाखल का केला नाही, यासंदर्भात विचारणा करणारे पत्र विभागीय सहनिबंधकांकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविले आहे. बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह अाजी-माजी संचालक अाणि अधिकारी अशा ६६ जणांवर २९ काेटी ६१ काेटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्याची चाैकशी सुरू अाहे.

बंॅकेच्या अार्थिक घाेटाळ्यासंदर्भात सहकारमंत्र्यांनी चाैकशी करण्याचे अाश्वासन िवधानसभेत दिले होते. त्यानंतर झालेल्या चाैकशीत तथ्य अाढळल्याने धुळे येथील विशेष लेखापरीक्षकांकडून अाजी-माजी संचालकांसह ६६ जणांवर अार्थिक जबाबदारी निश्चित करण्याप्रकरणी कारवाई सुरू अाहे. यात ३१ संचालक, तज्ज्ञ संचालक, एमडींसह १८ अधिकारी, १४ कर्मचारी प्रतिनिधी यांना म्हणणे सादर करण्यासाठी यापूर्वीच नाेटीस बजावली अाहे. काही संचालकांनी न्यायालयात तर काहींनी सहकार मंत्र्यांकडे जाऊन वैयक्तिक जबाबदारीप्रकरणी स्थगिती मिळवली अाहे.

बंॅकेच्याअार्थिक घाेटाळ्यांमधील दाेषींवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात शासनाने चाैकशी अधिकारी असलेल्या नाशिक येथील सहनिबंधकांना पत्र दिले अाहे. पुढील कारवाईसंदर्भात सहनिबंधकांनी जिल्हा पाेलिस अधीक्षकांना हे पात्र पाठवले अाहे. पाेलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्याकडे हे पत्र अाले असून त्यांनी संबंधितांची चाैकशी सुरू केली अाहे.

पत्रातकाय अाहे अजून बघितले नाही : जिल्हाबंॅकेसंदर्भात पत्र प्राप्त झाले अाहे. मात्र, अन्य कामात व्यस्त असल्याने त्यात काय अाहे हे अजून बिघतले नाही. त्यामुळे पत्रात काय अाहे, हे सांगता येणार नाही, असे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ.जे.डी. सुपेकर यांनी सांिगतले.

असे झाले बंॅकेचे नुकसान
जनताअपघात वमिा काेटी ९४ लाख २६६ रुपये, जे.टी.महाजन सूतगिरणी विक्रीप्रक्रिया काेटी २५ लाख १७ हजार, अमळनेर येथील बखळ जागेची विक्री मूल्यांकन लाख ७८ हजार ४५० रुपये, वसंत सहकारी साखर कारखाना विक्री ७९ लाख ४७ हजार ७७० रुपये, बंॅकेचे संगणकीकरण १६ काेटी ६० लाख ८३ हजार रुपये.