आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon District Leading In Investigation: Special Director General Kamalakar

जळगाव जिल्हा तपासात अव्वल : विशेष महानिरीक्षक कमलाकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव पोलिसांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गुन्ह्यांची संख्या जळगावात अधिक असली तरी या गुन्ह्यांच्या तपासात जळगाव जिल्हा नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांनी दिली.

कमलाकर जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी बुधवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यांनी सांगितले की, जळगाव शहरात आगामी काळात होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दल तप्तर असून महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम आम्ही आतापासूनच सुरू केलेली आहे. त्या दृष्टीने पोलिस दलातर्फे नियोजन सुरू आहे. निवडणूका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने हालचाली आहेत.

दोनऐवजी आता चार बीट मार्शल
नाशिक परिक्षेत्रात चांगल्या पोलिसिंगसाठी आम्ही विशेष योजना सुरू केली असून या पुढे प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ऐवजी चार बीट मार्शल कार्यरत असणार आहेत. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. घरकुल प्रकरणात अप्पर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या कामाचेही कमलाकर यांनी कौतुक केले.

नाशिक परिक्षेत्रात विशेष कामगिरी
जळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुन्हे घडण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे. त्यामुळे दाखल होणार्‍या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. मात्र, तपासात जळगाव जिल्हा अव्वलस्थानी आहे. जळगाव जिल्ह्यात तपासाचे जितके प्रमाण आहे. तितके प्रमाण नाशिक परिक्षेत्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात नाही. नाशिक परिक्षेत्रात येणार्‍या अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे तपासाचे प्रमाण कमी आहे.