आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे नैराश्य आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल: सततची  नापिकी, सोसायटीचे कर्ज,  उपवर मुलीच्या लग्नाची काळजी यामुळे हे  नैराश्य आल्याने तालुक्यातील डोंगरकठोरा येथील 52 वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी त्यांच्या खळयातील निंबाचे झाडास गळफास घेवून आत्महत्या केली आहे.  

डोंगरकठोरा ता. यावल येथील शेतकरी कमलाकर भागवत सरोदे वय 52 वर्षे  हे सर्वसाधारण शेतकरी होते. गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकटाने तर पावसाच्या लहरीपणामुळे  शेतीच्या हंगामावर परीणाम झाला होता. त्यातच सोसायटीचे असलेले कर्ज व उपवर मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे सरोदे आर्थिक अडचणीत सापडले होते म्हणून त्यांना नैराश्य आले होते. असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पहाटे गुरांना चारा-पाणी करण्यासाठी जातो असे सांगून ते खळयात गेले होते.  त्यांनी खळयातील निंबाचे झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी आठ वाजता समजले. कमलाकर सरोदे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी सुन असा परीवार आहे. शंकर यशवंत वारके यांनी दिलेल्या खबरीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रुग्नालयात डॉ. देवश्री घोषाल यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम चौधरी पुढील तपास करीत आहेत. लग्नाच्या चिंतेने गेला जीव.  कमलाकर सरोदे यांच्याकडे चार बिघे कोरळवाहू शेती होती व गेल्या काही वर्षापासुन यातून नापिकीसह नैसर्गिक आपत्ती अशा विविध अडचणींमुळे वि.का.सो.चे ६० हजाराचे कर्ज दर वर्षी जुने- नवे करण्याकरीता घेतली जाणारी हात उसनवारीचे कर्ज व उपवर मुलीच्या लग्नाच्या काळजीने त्यांचा जिव गेला. 
 
बातम्या आणखी आहेत...