आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेच्या खड्डय़ांमुळे दोघांचा बळी, महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळूनही खड्डे तसेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळधी - बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द येथील बखाले कुटुंबीय हे मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरून नांदुर्‍याकडे क्रुझर (एमएच 28 व्ही 2177)ने घरी जात होते. धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाच्या पुढे त्यांच्या क्रुझर गाडीस अमरावतीहून बडोद्याकडे मोसंबी भरलेल्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात क्रुझरमधील गाडीमालक र्शीकृष्ण गणपत बखाले (वय 57, रा. नांदुरा खुर्द) व क्रुझरचालक विकास हरी सुरवाडे (वय 35) या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात पाळधी येथील महामार्ग पोलिस चौकीपुढे शनिवारी सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात क्रुझरमधील मयत र्शीकृष्ण बखाले यांची पत्नी इंदुबाई बखाले यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या कानाजवळ जबर मार लागला आहे. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पार्थ शैलेंद्र बखाले व शैलेंद्र लक्ष्मण बखाले हे बखाले कुटुंबीय जखमी झाले आहे
ट्रक व क्रुझर यांच्यात झालेला हा अपघात खड्डे चुकवण्याच्या नादात झाला असावा, असा अंदाज काही प्रत्यशदर्शींनी वर्तवला. या अपघात झालेल्या महामार्गावरील परिसरात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून अत्यंत खोल खड्डे असल्याने नेहमीच खड्डे चुकविण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहनांना अपघात होण्याची शक्यता असते. याच खड्डय़ात काही दिवसांपूर्वी दुचाकीवरून एक वृद्धा पडल्याने तिचे कंबर मोडले होते, अशी माहिती काहींनी दिली.
महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तर बर्‍याच ठिकाणी साइडपट्टय़ा खचल्या आहेत. या साइडपट्टय़ा दुरुस्त करण्याची आवश्यकता असताना त्याकडेही दुर्लक्ष झालेले दिसून येते. दरम्यान, महिनाभरापूर्वी महामार्ग दुरुस्तीसाठी निधी मिळाला मात्र, त्यानंतरही खड्डे ‘जैसे थे’ आहेत.