आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वीच्या परिक्षेत जळगाव जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार 30 रोजी घोषित झाला. नाशिक विभागाचा निकाल 88.22 टक्के लागला अाहे.  नंदुरबार जिल्ह्याचा सर्वाधिक 91.05 टक्के निकाल लागलेला आहे. तर जळगाव जिल्हाचा निकाल 87.62 टक्के लागल्याने जिल्हा विभागात तिसऱ्यास्थानावर पाेहचला अाहे.

नाशिक विभागीय मंडळाच्या कक्षेतील 952 कनिष्ट महाविद्यालयातील 1 लाख 59 हजार 540 विद्याथ्र्यानी बारावीची परीक्षा दिली होती. विभागातील 218 केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील 43 हजार 27, धुळे जिल्ह्यातील 22 हजार 186, नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 315 विद्यार्थी तर नाशिक जिल्ह्यातील 61 हजार 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात नंदुरबारचा सर्वाधिक 91.05 टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ धुळे 90.89, जळगाव 87.62 तर नाशिकचा 87.9 टक्के निकाल लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...