आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: यावलमध्ये जमावाची दोन विद्यार्थ्यांना मारहाण, महिला पोलिसात गेल्याने मुलाला चोपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - साने गुरूजी विद्यालयातील जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी शहरात पुन्हा वाद उफाळला. त्यात एका गटाने दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या विद्यार्थ्यांवर सुरुवातीला ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर जळगावला हलवण्यात आले. या प्रकरणी 9 जणांसह 4 अज्ञात आरोपींविरुद्ध दंगलीसह अन्य सहा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शहरात वाढलेल्या या प्रकारांवर पायबंद घालण्याच्या मागणीसाठी शेकडोंचा जमाव पोलिस ठाण्यात एकत्र आला होता.
 
पालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाचे 6 फेब्रुवारीला स्नेहसंमेलन होते. या स्नेहसंमेलनात एका समूह गीतावेळी गोंधळ उडाला. साऊंड सिस्टीम बंद पडल्याने वाद उफाळून हाणामारी झाली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांसह एकूण 20 जणांवर अॅट्रॉसिटीसह दंगलीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयीत विद्यार्थी कुंदन शशिकांत बडगुजर हा सकाळी 11.30 वाजता दरम्यान कामानिमित्त पालिकेच्या व्यापारी संकुलात गेला होता. तेथे एका टोळक्याने त्याला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी कुंदन बुडगुजर घराकडे पळाला. यानंतर शेजारील महिला शोभाबाई कोल्हे यांनी कुंदनला घेवून पोलिस ठाणे गाठले. मात्र, याचा राग आल्याने हितेश गजरे, विलास भास्कर, युवराज समरथ सोनवणे, युवराज सुपडू भास्कर (सर्व रा.बोरावल गेट),चेतन दिलीप गजरे, आनंद बिऱ्हाडे, आकाश सुरवाडे, विशाल गजरे, स्वप्निल पारधे (सर्व रा.सिद्धार्थनगर,यावल) आणि इतर 4 ते 5 जणांनी शोभाबाई यांचा मुलगा विशालला घरात घुसून फायटरने मारहाण करून जखमी केले. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी विशालला जमावाच्या ताब्यातून सोडवले. याप्रकरणी विशाल कोल्हे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध अनधिकृतपणे घरात शिरून जबर दुखापत करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देण्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहायक फौजदार विठ्ठल धनगर, हवालदार संजय तायडे तपास करीत आहेत.

दोघे विद्यार्थी गंभीर
व्यापारी संकुलात जबर मारहाण झाल्याने कुंदन बडगुजर याच्या डोक्याला इजा झाली. यामुळे त्याचे नाक व कानातून रक्तप्रवाह झाला. तर विशाल कोल्हे याच्या डोक्याचे व नाकाचे हाड तुटले आहे. दोघांवर यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. उमेश कवडीवाले यांनी प्राथमिक उपचार केले. यानंतर त्यांना जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.
 
सकाळी झाली मारहाण
कुंदन बडगुजर यास सकाळी 11.30 वाजता पालिकेच्या संकुलासमोर चेतन दिलीप गजरे, आनंद सुरवाडे व आकाश पारधे (सर्व रा.सिद्धार्थनगर) यांनी मारहाण केली. याप्रकरणी शोभाबाई कोल्हे या कुंदनसोबत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, याचा राग आल्याने आरोपींनी शोभाबाईंचा मुलगा विशाललादेखील मारहाण केली. ही वार्ता शहरात पसरताच पोलिस ठाणे व रुग्णालयात गर्दी झाली होती.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...