आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिका : सर्वाधिक मताधिक्याने सुरेश भोळे विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीत मतांसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस राहिली. सर्वात कमी 15 मतांनी भाजपचे उमेदवार अनिल देशमुख तर सर्वाधिक मतांनी भाजपचे उमेदवार सुरेश भोळे विजयी झाले. भोळे यांना 2828 मते मिळाली.

प्रभाग 10 अ मध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर अत्तरदे यांचा केवळ 82 मतांनी पराभव झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी अश्विन सोनवणे यांना 1800 मते मिळाली. प्रभाग 27 मध्ये अजय पाटील यांना 1378 मते मिळाली, तर मनोज आहुजा यांना 1324 मते मिळाल्याने त्यांचा 54 मतांनी पराभव झाला. प्रभाग 33 अ मध्ये अनिल देशमुख यांचा अवघ्या 15 मतांनी विजय झाला. या प्रभागातून समाजवादीचे खाते उघडता उघडता राहिले. सर्वात कमी 20 मते प्रभाग एक मधील भारीप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला मिळाली.

शंभरीही ओलांडली नाही
उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मातब्बर नेत्यांची दमछाक झाली. पण नवख्या आणि चमकोंना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. तब्बल 45 उमेदवारांनी मतांची शंभरीही ओलांडता आली नाही.

सर्वाधिक मताधिक्य मिळविलेले उमेदवार
सुरेश भोळे 2828
प्रा.चंद्रकांत सोनवणे 2752
चेतन शिरसाळे 21901
जयश्री महाजन 2101
ललित कोल्हे 2075
सुनील महाजन 1827