आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Election Review And NCP And BJP Analysis

राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या गणिताने संख्याबळ घटले, भाजपचे बळ वाढले पण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक विशलेषण

राष्ट्रवादी काँग्रेस : लोकसभेच्या गणिताने घटविले संख्याबळ

शहरातील राजकीय अस्थिरता पथ्यावर पडण्याची स्थिती असूनही राष्ट्रवादीने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. निवडणुकीच्या तोंडावर गुलाबराव देवकरांचे मंत्रिपद काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा फुगा फुटला. पक्षातील अंतर्गत कलह आणि तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका, पालकमंत्र्यांची पाठ आणि स्थानिक पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष विचारात घेतले तर राष्ट्रवादीचे पानिपत होणार हे गृहीत धरले जात होते. ही त्यांच्या पराभवाची कारणे ठरली.
महापालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच राष्ट्रवादीने रस दाखविला नाही. राष्ट्रवादीचे आहे ते नगरसेवक आपल्यासोबत रहावे यासाठीही प्रयत्न झाले नाहीत. पक्षाकडून दबाब असल्याने स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले खरे, परंतु त्यातील काहीच लढले. जे निवडून आले त्यातील बहुतांश स्वत:च्या मेहनतीवर. पक्ष म्हणून र्शेय घेण्यासारखा एखादा-दुसराच असल्याचे लक्षात येते. या निवडणुकीत पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्‍यांनी राजकारण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या जाहीर सभादेखील काहीच जादू दाखवू शकल्या नाहीत.