आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्यापासून बाळगा सावधगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रस्त्यावरील खांबावर विद्युत प्रवाह उतरून विजेच्या धक्क्याने मृत्यू पावण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. विजेच्या धक्क्याने दहा महिन्यांत पाच जणांना प्राण गमवावे लागले आहे. या घटना वाढत असताना वीज कंपनी मात्र बेफिकीर आहे. पावसाळ्यातील विजेच्या धोक्यापासून नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.

धोकादायक खांबांकडे दुर्लक्ष

शहरातील हॉटेल काशिनाथजवळ शनिवारी रात्री बाहेर खेळताना दर्पण निफाडकर या सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हा टेलिफोनचा खांब असल्याने ती आपली जबाबदारी नसल्याचे ‘क्रॉम्प्टन’च्या सूत्रांनी सांगितले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर खांबात वीजप्रवाह उतरल्याने जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. धोकादायक वीज खांब्यांचा सर्व्हेच होत नसल्याने या घटना वाढत आहेत. ‘क्रॉम्प्टन’ने या धोकादायक खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही होत आहे.

अशी घ्या खबरदारी
0 पावसाच्या वेळी घरातील विजेची यंत्रे बंद ठेवा.
0 विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी घातक ठरू शकते.
0 विजेच्या धक्क्यापासून सुरक्षित राहण्यासाठी अर्थिंग करावे.
0 टेस्टरसारखी उपकरणे वीज तपासण्यासाठी वापरा
0 विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्यास झाड अथवा पत्र्याच्या शेडचा आसरा घेऊ नये.
0 गच्च्ीवर कपडे वाळत घालण्यासाठी तारा किंवा लोखंडी वस्तूंऐवजी प्लास्टिकच्या दोर्‍यांचा वापर करावा.

चूक लक्षात घेऊन भरपाई
तारांवर आकडे टाकून वीज घेताना खांबात प्रवाह उतरतो. त्यामुळे होणार्‍या अपघातास आकडे टाकणाराच जबाबदार असतो. मात्र, विजेचा अपघात घडल्यास पंचनामा केला जातो. त्याची माहिती विद्युत निरीक्षकांकडे जमा होते. त्यांच्यामार्फत घटनेचे गांभीर्य, स्थिती व चूक लक्षात घेऊन नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जातो. ही दीर्घ प्रक्रिया आहे. डॉ. व्ही.पी.सोनवणे, युनिट हेड, क्रॉम्प्टन

प्रथमोपचाराने वाचू शकतात प्राण
आकाशातून कोसळणारी वीज हृदयाच्या स्नायूंवर आघात करते. वीज कोसळल्यानंतर इजा झाली नाही तरीदेखील रुग्णालयात जाऊन स्नायूंची क्षमता तपासणी करून घ्यावी.