आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका गाळेधारकांवरील कारवाईला लागणार ‘ब्रेक’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डॉ. शामाप्रसाद मुखर्जी संकुलातील दुकानांच्या स्थलांतरासंदर्भात जिल्हा न्यायालयात दाखल अपिलात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.4 फेब्रुवारी रोजी निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने कोणतीही कारवाई करू नये असे निवेदन गाळेधारकांनी पालिकेला दिले आहे. अशा परिस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेकडून होणार्‍या कारवाईला ब्रेक लागणार आहे.

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी संकुलातील 47 दुकानांचे स्थलांतर करण्यासंदर्भात 18 जानेवारी रोजी दुकानदारांना नोटीस दिली होती. स्थलांतरासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे 21 दुकानदारांनी कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून जिल्हा न्यायाधीश इंदिरा जैन यांच्या न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेतर्फे कॅव्हेट दाखल केले आहे.

यासंदर्भात सोमवारी न्यायाधीश जैन यांच्या न्यायालयात महापालिका व दुकानदारांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. त्यात दुकानदारांचे स्थलांतर व रस्त्याचे रुंदीकरणाचे आदेश बेकायदेशीर असल्याची दुकानदारांतर्फे बाजू मांडण्यात आली. त्यावर आता 4 फेब्रुवारी रोजी निकाल देण्यात येणार आहे. पालिकेतर्फे अँड. हेमंत त्रिपाठी तर दुकानदारांतर्फे अँड. गणेश सोनवणे, अँड.देवेंद्र पारळकर काम पाहत आहेत.

न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कारवाई न करण्याचे निवेदन

यासंदर्भात निकाल आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कायद्याचा सन्मान म्हणून 18 जानेवारीच्या आदेशानुसार कोणतीही कारवाई करू नय, असे दुकानदार नरेंद्र सोनवणे, शेख सादिल रऊफ, राधेश्याम शर्मा, दीपक साळुंखे, आनंद बडगुजर, दीपक कवठळकर, प्रमोद निकम आदींनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

कारवाई थांबणार

डॉ.मुखर्जी संकुलातील दुकानदारांना स्थलांतरित करून रस्ता रुंदीकरणासाठी दुकाने पाडण्याच्या कारवाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पालिकेने दुकानदारांना 10 दिवसांची मुदत दिली असली तरी हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. त्यावर पुढच्या आठवड्यात निर्णय होणार आहे. अशा परिस्थितीत पालिका कारवाई करण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.