आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौर ढेकळेंच्या मुलाचा हद्दपारीचा आदेश रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी महापौर सदाशिव ढेकळे यांचा मुलगा मधुकर ढेकळे यांच्यावर १० जानेवारी २०१५ला वर्षाच्या हद्दपारीचे आदेश काढले होते. उच्च न्यायालयाने हे आदेश शुक्रवारी रद्द केले. ढेकळे यांच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी १० जानेवारीला वर्षाच्या हद्दपारीचे आदेश काढले होते. त्यानंतर ढेकळे यांनी याविरोधात महसूल आयुक्तांकडे अपील केले होते.
त्यात हद्दपारी वर्षावरून महिने करण्यात आली होती. त्याच्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. शुक्रवारी याचा निकाल लागला, यात पुढील आदेश होईपर्यंत हद्दपारी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.