आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फाेट; दोघांचा मृत्यू; जळगावजवळील दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -शिरसाेली रस्त्यावरील श्यामा फायरवर्क्स इंडस्ट्रीज या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये मंगळवारी दुपारी ३.५० वाजता भूकंपासारखा भीषण स्फाेट झाला. स्फाेटाची तीव्रता ही कारखान्यापासूनच्या किलाेमीटरपर्यंत हाेती. यात एका मंदिराच्या तावदानाच्या काचाही फुटल्याने शिरसाेलीकर हादरले. कानठळ्या बसवणाऱ्या अावाजाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. 
 
शिरसाेली येथे ७५ एकर परिसरात श्यामा फायरवर्क्स इंडस्ट्रीज उभारण्यात अाली अाहे. यातील २० एकरचा झाेन हा सेफ्टी झाेन अाहे. यामध्ये फक्त प्रशिक्षित कामगारांनाच जाण्याची परवानगी असते. कारखान्यात सुमारे ७० ते ७५ कामगार काम करतात. २८ एप्रिलपासून कारखान्याला सुटी हाेती. सुटीनंतर मंगळवारी पहिलाच दिवस असल्याने ३० ते ३५ कामगार कामावर अाले हाेते. दुपारी जेवण केल्यानंतर राजेंद्र तायडे अाणि हेमंत जयस्वाल दाेघे सफाई काम करीत हाेते. नेमका त्याचवेळी हा भीषण स्फाेट झाला. यात दाेघांचा करुण अंत झाला. ज्या खाेलीत स्फाेट झाला ती पूर्ण जमिनदाेस्त झाली. तर ज्या ठिकाणी रसायनांचा डबा ठेवलेला हाेता. त्या ठिकाणी जमिनीला दाेन फुटांचा खड्डा पडला. स्फाेट इतका भीषण हाेता की, कारखान्यापासून ५ किलाेमीटरचा परिसर अक्षरश: हादरला. त्या वेळी काही ग्रामस्थांना भूकंप झाल्याचा, राॅकेटचा किंवा सिलिंडरचा स्फाेट झाल्याचे वाटले. मात्र, काहीवेळानंतर फटाक्यांच्या कारखान्यात स्फाेट झाल्याचे समजल्यावर ग्रामस्थांनी कारखान्याकडे धाव केली. स्फाेटाच्या अावाजाने शिरसाेली, बाेरनार, महाबळ परिसरातील नागरिकांच्या कानठळ्या बसल्या. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, एपीआय सचिन बागुल यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. 

सन१९८३ मध्ये झाला हाेता स्फाेट 
श्यामाफायरवर्क्स इंडस्ट्रीजमध्ये सन १९८३ मध्येही अशाच प्रकारचा स्फाेट झाला हाेता. त्या वेळी एका कामगाराचा मृत्यू झाला हाेता. तर दाेन वर्षांपूर्वी डाेंगरावरील गाेदामात स्फाेट झाला हाेता. यात गाेदामाचे छत उडून लांब पडले हाेते.
 
कारखान्याच्या परिसरात २७ खाेल्या अाहेत. यापैकी खाेल्यांमध्ये मिक्सिंगचे काम चालते. या सर्व खाेल्यांच्या बाहेर अल्युमिनियम अाणि काॅपरच्या प्लेट लावल्या अाहेत. त्या प्लेटला स्पर्श करून कामगारांना अात जाणे गरजेचे असते. त्यामुळे शरीरातील स्टॅटीज चार्ज न्यूट्रलाइज हाेताे. तसेच सर्व खाेल्यांच्या बाहेर फायर इस्टिंग्युशर, पाण्याची टाकी, वाळूने भरलेल्या बादल्या अाहेत. तसेच प्रत्येक खाेलीमध्ये ३० फुटांपेक्षा जास्त अंतर अाहे. प्रत्येक खाेली १०० वर्ग फुटाची असून खाेलीच्या बाहेर ४०० वर्गफुटाची संरक्षण भिंत बांधलेली अाहे. मिक्सिंगच्या प्रत्येक खाेलीत दिवसाला केवळ किलाे रसायन मिक्स करण्याची परवानगी असते. त्यामुळे दरराेज तेवढेच रसायन मिक्स केले जाते. 
 
स्फोटाबाबत चौकशीचे आदेश 
स्फाेटातदोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाइकांना काही शासकीय मदत मिळेल काय, याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, ही घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नाही. त्यामुळे शासकीय मदत मिळू शकणार नाही. मात्र, मानवतेच्या दृष्टिकोनातून मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रयत्न करेल. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवेल. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
भूकंप झाल्याचा भास 
- स्फाेट झाला त्यावेळी मी घरात झाेपलेलाे हाेताे. मात्र, अावाज इतका भीषण हाेता की, कानठळ्या बसून परिसर हादरला. तसेच सुरुवातीला भूकंप झाल्याचा भास झाला. मुरलीधर काेळी, शिरसाेली
 
राॅकेट सारखा अावाज 
-अाकाशात राॅकेट फुटल्यावर धुराचे लाेट तयार हाेतात. त्या वेळी जसा अावाज हाेताे, तसाच मोठा अावाज झाला. मात्र, त्यानंतर फटाका कारखान्यात स्फाेट झाल्याचे कळाले. संताेष पाटील, महाबळ परिसर 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...