आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: तेरा वर्षांपासून दाेन मित्रांची साेबत ‘अखेरच्या प्रवासात’ही कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाेकसागरात बुडालेली राजू तायडे यांची पत्नी व चिमुरडी मुले. - Divya Marathi
शाेकसागरात बुडालेली राजू तायडे यांची पत्नी व चिमुरडी मुले.
जळगाव - शिरसाेली येथील श्यामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी झालेल्या भीषण स्फाेटात दाेन कामगारांचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील राजू बाबूराव तायडे (वय ३५) अाणि मध्य प्रदेशातील खरगाेन जिल्ह्यातील भामपुरा येथील हेमंत प्रेमलाल जयस्वाल (वय ४५) अशी मृतांची नावे अाहेत. गेल्या १३ वर्षांपासून हे दाेघे एकाच कारखान्यात साेबत काम करत हाेते. ‘अंतिम प्रवासा’तही या दाेन मित्रांची साेबत कायम राहिल्याने अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांची मने हेलावून गेली हाेती.  ‘माझ्या पप्पाला परत अाणून दे गं मम्मी...’ असा राजू तायडेंच्या मुलींचा अाक्राेश तर काळीज चिरून गेला.  

राेजगारासाठी जयस्वाल अाणि तायडे कुटुंब गेल्या १७  वर्षांपासून जळगावात वास्तव्याला अाहे. राजूचे वडील बाबूराव तायडे हे १७ वर्षांपासून या कारखान्यात काम करत हाेते. त्यामुळे राजू याच कारखान्याच्या परिसरात लहानाचा माेठा झाला. काही दिवस त्याने हाॅटेलवर काम केल्यानंतर ताे याच कारखान्यात काम करू लागला. तर जयस्वाल हे नाेकरीच्या निमित्ताने १३ वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातून जळगावात अाले हाेते. राजू अाणि हेमंत हे दाेघे गेल्या १३ वर्षांपासून साेबतच काम करत हाेते. बुधवारी दुपारी त्यांची अंत्ययात्राही साेबत काढण्यात अाली.   
 
नि:शब्द करणारा अाक्राेश  
मृत राजू तायडे यांच्या पश्चात पत्नी,  मुलगी पायल (वय ७), पल्लवी (वय ४) असा परिवार अाहे.   ‘माझ्या पप्पाला परत अाणून दे गं मम्मी...’, ‘अाता मी काेणाला पप्पा म्हणू...’, ‘ अाता मला खाऊ काेण अाणून देणार...’, ‘पप्पा उठा ना हाे...’, ‘तुम्हाला शपथ अाहे...’, ‘मम्मी ,पप्पा माझ्याशी का बाेलत नाही गं...’ असा अाक्राेश पायल व पल्लवी करत हाेत्या. तर राजेंद्रची अाई सविता यांनीही  टाहाे फाेडला. वडील बाबूराव मुलाच्या मृतदेहाकडे एकटक बघत नि:शब्द झाले हाेते.
 
हे पण वाचा,
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...