आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये फी माफीच्या आदेशानंतरही वसुली सुरूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत 9 जानेवारी रोजी आदेश काढूनही महाविद्यालये आणि विद्यापीठ मात्र या निर्णयापासून अनभिज्ञच आहेत. परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांकडून सर्रास फी वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यांमधील गावांमध्ये 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी असल्याने या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने दुष्काळी भागासाठी जाहीर केलेल्या पाच प्रमुख निर्णयात परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे.

पंधरा दिवसांपूर्वी त्याबाबत लेखी आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानंतरदेखील महाविद्यालयांमध्ये दुस-या सत्रांसाठी परीक्षा अर्ज भरताना परीक्षा शुल्काची वसुली केली जात आहे. फी माफीच्या आदेशाबाबत एकाही महाविद्यालयाने विद्यापीठाकडे मार्गदर्शन मागविण्याची तसदी घेतलेली नाही.
आदेशच आले नाहीत !
परीक्षा फी माफीबाबत शासनाकडून कोणताही आदेश किंवा सूचना नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला नाही. आदेशानंतरच पुढचा निर्णय होईल.’’
डॉ. ए. एम. महाजन, कुलसचिव.