आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव फेस्टिवल; गायन, नृत्याविष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गीतझंकार निर्मित मेलडी सुपरहिट अाॅर्केस्ट्राच्या 'जळगाव फेस्टिवल-२०१५' मध्ये गायक महंमद रफी, किशाेरकुमार यांची गीते अन् 'बेबी डाॅल'सारख्या नृत्याचे बहारदार पद्धतीने
मुलांनी सादरीकरण करत उपस्थितांकडून दाद मिळवली.

कांताई सभागृहात शुक्रवारी अायाेजित या कार्यक्रमाचे उद‌्घाटन जैन स्पाेर्ट्स अकॅडमीचे समन्वयक फारुख शेख यांनी केले. या वेळी अध्यक्ष विजयकुमार काेसाेदे, माेहन तायडे
उपस्थित हाेते. कार्यक्रमात गायन, एकल नृत्य, समूह नृत्याची स्पर्धा घेण्यात अाली. मेलडी ग्रुपने ५० व्या वर्षात पदार्पण केले अाहे. तर बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
म्हणून रजनिकांत काेठारी, मू. जे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. अार. चाैधरी उपस्थित हाेते. श्याम जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
२० स्पर्धकांचा सहभाग
गीतगायनानेकार्यक्रमाची सुरुवात झाली. यात खुल्या गटात 'मधु बन मैं राधिका नाचे रे', 'देवा तुझ्या गाभाऱ्याला', 'तुम्हा वर केली मी मर्जी बहाल', मेरे ढाेलना' अादी गीतांचे सादरीकरण करण्यात अाले. जवळपास २० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नाेंदवला. गीतगायनाची परीक्षण अार. डबी. पाटील, अरुण नेणवे, अताशा पाटील यांनी केले. तर नृत्याचे परीक्षण संध्या जहांगीर, वैशाली पाटील यांनी केले.
दाेन गटात झाली स्पर्धा
१४वर्ष अातील पुढील अशा दाेन गटांत एकल नृत्य स्पर्धा झाली. गीत-गायनास की-बाेर्डवर शिवम चक्रवर्ती, अाॅक्टाेपॅडवर युवराज साेनवणे, काेंर्गाे दीपक तायडे, ढाेलकीवर शरद भालेराव यांनी साथसंगत केली. कार्यक्रमास भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन, गजानन काेळी, सुनील तायडे, कपील घुगे, शेखर तायडे, बंटी उभांडीक यांचे सहकार्य लाभले.
बातम्या आणखी आहेत...