आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केट गाळेधारकांसाठी पट दंडाला गेहींचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका प्रशासनातर्फे शहरातील मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पट दंडाची आकारणी केली आहे. दुसरीकडे पालिकेच्या मालकीच्या ‘ट्रान्सपोर्ट’नगरातील गाळेधारकांचा करार २८ वर्षांपासून संपलेला असतानाही त्यांना मात्र वेगळा न्याय दिला जात असल्याने भाजपाचे नगरसेवक विजय गेही यांनी आक्षेप घेतला आहे.
मेहरूण सर्व्हे क्रमांक ३०/अ क्षेत्र ८७ आर सर्व्हे नंबर ३०/ब क्षेत्र ७९.९४ आर अशा पालिकेच्या हेक्टर ६६ आर जमिनीवर ट्रान्सपोर्टनगर आहे. येथील गाळेधारकांचा करार २८ वर्षांपासून संपला आहे. मात्र, पालिकेने त्यांना कोणतीही नोटीस बजावलेली नाही. या उलट शहरातील महात्मा फुले, सेंट्रल फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, भिकमचंद जैन मार्केट, चौबे मार्केट, छत्रपती शाहू महाराज मार्केट, वालेचा मार्केट, भोईटे मार्केट, नानीबाई मार्केट या आठ व्यापारी संकुलांचा करार वर्षांपासून संपल्याने त्यांना पट दंडाची आकारणी करण्यात येत आहे.
हुडकोच्या कर्जामुळे नवीन प्रीमियमची मागणी करून गाळेधारकांना वेठीस धरण्यात येत आहे. प्रशासनातर्फे केवळ आठ मार्केटमधील व्यापाऱ्यांनाच वेठीस धरण्यात येत आहे. पालिकेने कर्जफेडीसाठी जुनी नगरपालिका आणि साने गुरुजी रुग्णालयाची जागा पार्किंग कायम ठेवून बीओटी तत्त्वार विकसित करून घ्यावी. यासह आठही व्यापारी संकुलातील गाळेधारकांसोबत ३० वर्षांचा करार करून कमी भाड्याची आकारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विजय गेही यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.