आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनावरच भर; मंडळांचे एकमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गणेशोत्सवात शासनाच्या विविध विभागांच्या मदतीने सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्यासह एकोप्याने व सलोख्याने गणेशोत्सव साजरा करण्याचा ठराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात प्रशासन व गणेश मंडळ कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक झाली. त्यात हा ठराव करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचे डांबरीकरण करण्याची एकमुखी मागणी केली. बैठकीस पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर उपस्थित होते.

गणेश कार्यकर्त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. बेटी बचाव, लोकसंख्या नियंत्रण, रक्तदान यासह विविध सामाजिक प्रबोधनासाठी शासनाकडून माहितीपत्रक, बॅनर्स उपलब्ध व्हावे, अशी मागणीही मंडळांनी केली. यासह विसर्जन मिरवणुकीचा मार्गाची दुरवस्था झाली असून अपघाताची भीती वाढली आहे. यामुळे विसर्जनाआधी तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.