आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा जाळणे ठरू शकते जीवघेणे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या घंटा गाड्यांतील कचरा राष्ट्रीय महामार्ग व बहिणाबाई उद्यानामधील समातंर रस्त्यावर खोलगट भागात बिनधास्तपणे टाकण्यात येतो. या कचर्‍याची दुर्गंधी पसरू नये म्हणून तो पेटवून देण्याचे प्रकारही घडतात. बुधवारी असाच कचरा पेटवून देण्यात आला होता. सकाळी 11.08 वाजता परिसरात प्रचंड धुराचे लोट उठून महामार्गावर धुराची जणू भिंतच निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. तीन तास धुराचे हे लोट वाहतूक प्रभावित करीत होते. धुराने त्रस्त नागरिकांनी केला रास्ता रोको.
11.08 वाजता राष्ट्रीय महामार्गावर कचरा जाळल्यांने धुराची भिंत झाली तयार

03 तास धुराने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित केली होती
16 मार्च 2013 रोजी काय म्हणाले होते आरोग्यधिकारी विकास पाटील? आरोग्य विभागातर्फे आग लावणार्‍यांना पकडून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कचराकुंड्यामध्ये कचरा साचला तर आरोग्य विभागास फोन करावा.
कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा मनपाला पडला विसर कचराकुंडी पेटवल्याची घटना 14 मार्च 2013 रोजी कॉसमॉस बँकेजवळ घडली होती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपाने 16 मार्चला कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, यात सातत्या न राहिल्याने कचरा पेटवण्याच्या घटना वाढतच आहेत.