आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीप रायसोनींच्या जामिनावरील कामकाज लांबले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रदीप रायसोनी यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांनी औरंगाबाद खंडपीठात कामकाज होणार आहे.
रायसोनी यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती; परंतु वकिलांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे हे कामकाज आता दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले असल्याने या पुढील सुनावणीत रायसोनींना जामीन मिळतो किंवा नाही याकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे.