आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलधारकांकडे 10 कोटींची थकबाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेने शहरातील विविध भागात बांधलेल्या घरकुलांच्या मालमत्ता व सेवा शुल्क करापोटी 10 कोटी 5 लाख रुपये थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. आवाहन करूनही कर वसुली न झाल्यास गंभीर कारवाईचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
शिवाजीनगरात 724, गेंदालाल मिल भागात 2 हजार 69, पिंप्राळ्यात 1 हजार 554, वाल्मीकनगरात 124, खेडीत 80 असे एकूण 4 हजार 541 पालिकेची घरकुले आहेत. या घरकुलांकडे 2012-13 पर्यंत 9 कोटी 34 लाख 55 हजार 312 थकबाकी आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात 82 लाख 86 हजार 380 मिळणे अपेक्षित आहेत. आतापर्यंत संबंधित घरकुल रहिवाशांकडून 11 लाख 42 हजार 574 वसूल करण्यात आले आहेत. यानंतरही 10 कोटी 5 लाख 99 हजार 118 थकित आहेत. थकबाकी वसुलीसाठी घरकुल परिसरात रिक्षाद्वारे जाहीर आवाहन करणार आहेत. या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्यास जप्तीची किंवा बेदखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.