आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam. Mla Suresh Jain Medical Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयास प्राप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: घरकुल घोटाळ्यात सध्या तात्पुरत्या वैद्यकीय जामिनावर असलेले आमदार सुरेश जैन यांची वैद्यकीय मंडळासमोर तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. जैन यांच्या मुंबई येथील केईएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय मंडळासमोर झालेल्या तपासणीचा अहवाल शुक्रवारी न्यायालयास प्राप्त झाला आहे.
सध्या वैद्यकीय कारणासाठी तात्पुरत्या जामिनावर असलेले आमदार जैन यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल येथे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जैन यांच्या तात्पुरत्या जामिनाची मुदत संपल्याने त्यांनी ही मुदत वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी दरम्यान न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांनी जैन यांच्या तात्पुरत्या जामिनाला एक महिन्याची मुदत वाढ देतांना जैन यांच्या तब्येतीची मुंबई येथील केईएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय मंडळासमोर त्यांची चौकशी करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. ही तपासणी एक महिन्याच्या आत करावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. त्यानुसार जैन यांची तपासणी झाली किंवा नाही? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.
शुक्रवारी सकाळी केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. संजय ओक यांच्या सहीनिशी आमदार जैन यांच्या वैद्यकीय तपासणीचे कागदपत्रे न्यायालयास प्राप्त झाली आहेत; पण न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित हे रजेवर असल्याने त्या पाकिटातील अहवाल रेकॉर्डवर आलेला नाही.
न्यायाधीश दीक्षित हे सुटीवरून परतल्यानंतर या पाकिटातील अहवालाला रेकॉर्डवर घेतले जाईल व त्यानंतर त्याच्या प्रती तपासाधिकारी सिंधू व सरकारी वकिलांना देण्यात येतील. जैन यांच्या अहवालात नेमके काय आहे. हे आताच सांगणे कठीण असले तरी, लवकरच त्यांच्या आजाराबाबत स्पष्ट होणार आहे.