आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue, Gulabrao Devkar In Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबराव देवकर: बांधकाम ठेकेदार, नगरसेवक, सभापती ते थेट राज्यमंत्री पद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल योजनेच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एकदा मंत्रीपद वाचविण्यात यशस्वी झालेल्या पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मानगुटीवर बसलेले कारवाईचे ‘भूत’ उठण्याचे नाव घेत नसून कोर्टकचेरीचा ससेमिरा सुरुच आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय? याबाबत खलबते सुरू झाली आहेत. या गुन्ह्यातील आरोपी असलेले देवकर हे राज्यमंत्री पदापर्यंत पोहचले कसे याचा घेतलेला हा आढावा असा..
यशापाठोपाठ पराभवाचा दणका
2004 मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद व जिल्हा बॅँकेत उपाध्यक्षपद त्यांना मिळाले; परंतु 2008मध्ये झालेल्या पालिकेत देवकरांना पुन्हा जोरदार झटका बसला. या निवडणुकीत देवकर दांपत्याला पराभवाला सामोरे जावे लागले. देवकरांना शहर विकास आघाडीचे विनायक सोनवणे यांनी, तर छाया देवकर यांना भाजपच्या जयर्शी नितीन पाटील यांनी पराभूत केले.
अन् थेट विधान भवनात प्रवेश
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटलांचा पराभव केला. त्या वेळी जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता, बहुसंख्य आमदार नवखे असल्याने आमदार सुरेश जैन यांना शह देण्याचा यशस्वी डाव खेळून राष्ट्रवादीने त्यांच्याच शिष्याला राज्यमंत्रिपदी विराजमान केले.
सुरेश जैन यांच्या आशीर्वादाने वाटचाल
देवकर नव्वदच्या दशकात आमदार सुरेश जैन यांच्या संपर्कात आले. जैन यांनी सन 1991 मध्ये गणेश कॉलनी परिसरातील वॉर्डातून त्यांना उमेदवारी दिली. त्या वेळी देवकरांनी शंकर हरी पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, जेव्हा ते पहिल्यांदा निवडून आले तेव्हा जिल्हा परिषद कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. स्वत:पाठोपाठ पत्नी छाया देवकर यांनाही त्यांनी नगरसेविका म्हणून निवडून आणले. भाजपचे विद्यमान नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांचाही त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी वॉर्ड बदलवून पिंप्राळाचे प्रतिनिधित्व केले.
नगरपालिकापाठोपाठ जिल्हा बँकही
नगरपालिका हेच कार्यक्षेत्र न ठेवता सुरेश जैन यांचे बोट घट्ट पकडलेल्या देवकरांनी जिल्हा बॅँकेत मजूर फे डरेशनच्या माध्यमातून उमेदवारी करीत संचालकपदी विजय मिळवला. 11 मे 1999 ते 3 डिसेंबर 1999 या सहा महिन्यांच्या कालावधीत ते नगराध्यक्षही होते. सोबत नगरपालिकेत व महापालिकेत स्थायी समितीचे सभापती पद तसेच अन्य समित्यांवरही त्यांनी नेतृत्व केले.
जैन यांची साथ तुटली..
‘दादा तेथे आप्पा’ असे समीकरण जुळलेल्या गुरू-शिष्यातील वितुष्टाला कारणीभूत ठरली ती भुसावळ नगरपालिकेची 2005-06ची निवडणूक. तेव्हा सुरेश जैन हे राष्ट्रवादीत होते. कॅबिनेटमंत्री असताना आमदार जैन यांनी आपल्याच पक्षाचे आमदार असलेले संतोष चौधरींविरुद्ध एल्गार पुकारला होता. विशेष म्हणजे, आताचे कट्टर विरोधक असलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व जैन हे तेव्हा एकत्र आले होते. त्याच काळात जैन यांचे पक्षाशीसुद्धा फाटले होते. भुसावळ नगरपालिकेत जैन यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय व आमदार सुरेश जैन यांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने ‘7, शिवाजीनगर’वर दिवाळी साजरी होत होती. भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारापासून देवकर दोन हात लांब होते. त्याचाच राग म्हणून दादांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या देवकरांना दादांच्या दरबारात अपमानाला सामोरे जावे लागले आणि तेव्हापासून जैन यांच्या छत्रछायेतून लांब गेलेले देवकर पुन्हा त्यांना शरण गेले नाहीत.
बांधकामापासून कारकीर्द..
चाळीसगाव तालुक्यातील पळासरे येथील गुलाबराव देवकरांनी पाच एकर कोरडवाहू शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ऐंशीच्या दशकात जळगाव गाठले. सुरुवातीला त्यांच्या मामांच्या मालकीच्या र्शमजीवी मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून मजूर फेडरेशन या संस्थेच्या कामाच्या अभ्यासानंतर आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी मजूर फेडरेशनची निवड केली. मजूर फेडरेशनमध्ये पाय रोवणार्‍या देवकरांनी संचालकपदानंतर सभापतिपदही मिळवले.