आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीला भेटण्यास सुरेश जैन यांना परवानगी; घरकुलची 15 ला सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्याचा खटला न्यायाधीश दीक्षित यांच्या न्यायालयातून काढून घेऊन एन.आर. क्षीरसागर यांचे न्यायालयात वर्ग झाल्यानंतर बुधवारी त्यांच्यासमोर पहिलीच सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपपत्र आरोपींना मिळाले किंवा नाही? या बाबत दिलेल्या अर्जावर युक्तिवाद घेण्यात येऊन पुढील सुनावणी 15 रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले.

या पूर्वी सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अँड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी आरोपींना आरोपपत्र मिळाले आहे किंवा नाही? या बाबत दिलेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
यात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असताना बुधवारी मोजकेच आरोपी न्यायालयात हजर होते.

बहिणीला भेटण्यास जैन यांना परवानगी
आमदार सुरेश जैन यांची लहान बहीण जोत्स्ना दर्डा या मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये पाहण्यास जाण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, असा अर्ज जैन यांचेतर्फे अँड. अकील इस्माईल यांनी न्यायालयात बुधवारी दिला होता. या अर्जावर न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर यांनी निर्णय दिला असून जैन यांना चार तासांसाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये बहिणीस पाहण्यासाठी जाण्यास परवानगी दिली आहे.