आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा: सुरेश जैनप्रकरणी शुक्रवारी सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुरेश जैन यांना कारागृहाच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांच्या अर्जावर मंगळवारी जैन यांचे वकील व सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे बुधवारी त्रयस्त अर्जदार नरेंद्र पाटील यांच्या वकिलांचा युक्तिवाद होणार असून न्यायाधीश व्ही. एस. दीक्षित या अर्जावर 10 ऑगस्ट रोजी आपला निर्णय देणार आहेत.
सुरेश जैन यांच्या तात्पुरत्या जामिनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल राहू देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जैन हे पोलिसांच्या निगराणीत मुंबईच्या जे.जे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. आता त्यांना कारागृहाच्या ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज विशेष सरकारी वकील अँड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाकडे केला होता. या अर्जावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान आमदार जैन यांचे वकील अँड. एस. के. जैन यांनी युक्तिवादात सांगितले की, जैन यांना असलेला डायबेटीस व उच्च रक्तदाब अद्यापही नियंत्रणात नाही. त्यामुळे तो नियंत्रणात येतो तोपर्यंत जैन यांना खासगी रुग्णालयातच उपचार घेऊ द्यावेत. तर विशेष सरकारी वकील अँड. चव्हाण यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, न्यायालयाने जैन यांचा अंतिम नियमित जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे ते आता तात्पुरत्या जामिनावर नाहीत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत. त्यामुळे सरकार पक्षाने दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करावा, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली. त्रयस्त अर्जदार नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे वकील अँड. प्रमोद पाटील यांचा युक्तिवाद अद्याप बाकी असल्याने न्यायालयाने त्यांना बुधवारी युक्तिवाद करण्याचे आदेश दिले आहेत. तर सरकार पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर 10 ऑगस्ट रोजी निर्णय देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
सुरेश जैन यांना कारागृहाच्या ताब्यात देण्यासाठी अर्ज
आणखी एका प्रकरणात सुरेश जैन मुख्य आरोपी
पासपोर्ट परत मिळवण्यासाठीचा अर्ज सुरेश जैन यांनी परत घेतला