आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue Suresh Jain, Raisoni, Mayur Court Hearing On 13 June

सुरेश जैन, रायसोनी, मयूर यांच्या अर्जावर 13 ला सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार सुरेश जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी लागलीच जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. राजा मयूर हे आजारी असल्याने न्यायालयाने त्यांना दिलेला तात्पुरत्या जामिनाची मुदत संपली असल्याने मयूर यांनी मुदतवाढीसाठी दाखल केलेल्या अर्जावर 13 रोजी सुनावणी होणार आहे. जैन यांच्यासह या गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जैन यांच्यासह रायसोनी यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालय जामीन देत नसल्याचे पाहून त्यांनी तो अर्ज मागे घेत पुन्हा जिल्हा न्यायालयात जामीन मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता 13 रोजी सुनावणी होईल.