आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam MLA Suresh Jain Hearing At Supreme Court Today

सुरेश जैन यांच्या जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
जैन यांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा औरंगाबाद खंडपीठात नामंजूर झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनसाठी धाव घेतली आहे. जैन हे काही दिवसांपासून अटकेत आहेत. घरकुल घोटाळ्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे 24ला सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. तपासाधिकारी पंढरीनाथ पवार यांच्यामार्फत या नोटिसा प्रत्येक आरोपीपर्यंत पोहचविल्या. सर्वोच्च न्यायालयात जैन यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो? तसेच 24 रोजी जिल्हा न्यायालयात होणार्‍या सुनावणीला जैन हे न्यायालयात उपस्थित राहतात किंवा नाही याकडे लक्ष लागून आहे.