आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam MLA Suresh Jain Notice Issue

सुरेश जैन यांना गुरुवारी हजर राहण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार सुरेश जैन यांच्यासह 53 आरोपींना 24 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस प्रधान व जिल्हा न्यायाधीश इंदिरा जैन यांनी शुक्रवारी बजावली. दरम्यान, घरकुल घोटाळ्याचा खटला विशेष व तदर्थ जिल्हा न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांच्याकडून काढून घ्यावा, असा अर्ज विशेष सरकारी वकील अँड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी दिला आहे. या अर्जावरही 24 जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.

सूर्यवंशी यांनी सर्व 53 आरोपींना हजर करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली असून सुरेश जैन, प्रदीप रायसोनी, सदाशिव ढेकळे, शिवचरण ढंढोरे, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांच्यासह 53 आरोपींना 24 जानेवारी रोजी हजर करण्याची नोटीस बजावली आहे. विशेष सरकारी वकील अँड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाच्या कामकाजावर असमाधान व्यक्त करणारे पाच अर्ज यापूर्वीच दिले आहेत.