आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Suresh Jain Bail Application Withdrawal

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी आमदार सुरेश जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी आणि जगन्नाथ वाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्याआधीच शुक्रवारी मागे घेतले. खटल्यातील परिस्थितीत कोणतेही बदल झालेले दिसून येत नाहीत, अशा परिस्थितीत जामीन देऊ शकत नाही, या शब्दांत न्यायालयाने फटकारल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी काही तोंडी मागण्या करून अर्ज मागे घेतले.

न्यायालयाने सुरुवातीलाच जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे आरोपींतर्फे 4 जुलै रोजी हे प्रकरण सरन्यायाधीश अल्तमश कबीर यांच्यासमोर ठेवण्याची विनंती करण्यात आली. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नसल्याचा खुलासा न्यायालयाने केल्यामुळे ही मागणीही मागे घेण्यात आली. ‘उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्याची परवानगी द्या आणि हे जामीन अर्ज ठरलेल्या मुदतीत निकाली काढा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात नमूद करावे’, अशीही विनंतीही बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यावर ‘तुम्हाला जिल्हा किंवा उच्च न्यायालयात अर्ज सादर करता येईल. त्यासाठी परवानगीची गरज नाही. मात्र, आदेशात तसे नमूद करता येणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मयूर यांचा निर्णय सोमवारी खंडपीठात आरोपी राजेंद्र मयूर यांना औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्याची मुदत संपत असल्याने सोमवारी खंडपीठात सुनावणी होणार आहे.