आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Vaghur Project Contractor Deepesh Kotecha Investigation At Dsp Office

जळगाव घरकुल प्रकरण: वाघूरच्या ठेकेदाराची झाली दोन तास चौकशी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: घरकुल प्रकरणी सोमवारी नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर योजनेचे ठेकेदार दीपेश कोटेचा यांची तपासाधिकारी इशू सिंधू यांनी दोन तास चौकशी केली.
कोटेचा यांनाही रमेश जैन, नितीन लढ्ढा यांच्यासह शनिवारीच चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपण राजस्थानात असल्याने सोमवारी येणार असल्याचे कळविले होते. कोटेचा सायंकाळी 5 वाजताच लेखापरीक्षक पिल्लई यांना घेऊन आले होते. मात्र, सिंधू कार्यालयात नसल्याने काही काळ त्यांना वाट बघावी लागली.
बँक बॅलेन्सशीट घेतले ताब्यात
सिंधू यांनी कोटेचा व पिल्लई यांच्याकडून वाघूर योजेनच्या बांधकामाबाबत सर्व कागदपत्रे तसेच बॅँक बॅलेन्सशीट व बँक अकाउंटंट बाबतची कागदपत्र ताब्यात घेतली. या चौकशीप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक नितीन नेहूल हेही उपस्थित होते.
मयूर, वाणी यांच्या जामीन अर्जावर 13 रोजी सुनावणी
घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या चारही आरोपींचा जामीन जळगाव सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलेल्या राजा मयूर व जगन्नाथ उर्फ नाना वाणी यांच्या अर्जावर 13 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
जबाबाबाबत गुरुवारी सिंधूंची हजेरी
घरकुल घोटाळ्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या कलम 164 अन्वये न्यायालयातील कबुली जबाबाचे रहस्य सोमवारी संपेल, असे वाटत होते. मात्र, त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज दिलेले सिंधूच सोमवारी सुनावणीला उपस्थित राहू शकले नाही. ते न्यायालयीन कामासाठी औरंगाबादला गेले होते. त्यामुळे आता कबुलीजबाब प्रकरणी गुरुवारी पुढील सुनावणी होईल. रायसोनी हे कबुली जबाब देण्यास तयार आहेत, असा अर्ज सिंधू यांनी न्यायालयात दिला होता. त्यानुसार सिंधूंच्या अर्जानुसार प्रथम वर्ग न्यायाधीश ए. बी. होडावढेकर यांच्या समोर याबाबत कार्यवाही देखील झाली होती. रायसोनी यांना हजर करून याबाबत दोन तास कामकाजदेखील झाले होते. मात्र, कबुली जबाबाबाबत झालेल्या कार्यवाहीची सीलबंद प्रत न मिळाल्याने सिंधूंनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जावरील कामकाजासाठी सोमवारी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीश व्ही. एस दीक्षित यांनी दिले होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठात विजय वाणी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी खंडपीठात हजर राहणार असल्याचे सिंधू यांनी नितीन नेहूल यांच्यामार्फत न्यायालयाला कळविले होते.