आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सोने महागच; औरंगाबाद, नाशकात दोन हजाराने स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - देशात व राज्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू असली तरी सुवर्णनगरीचा लौकिक असलेले सोने राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने वरचढच आहे. युरोपातील लहान देशांची अर्थव्यवस्था खालावल्याने त्यांनी सोने विक्रीला काढण्याचा विचार जाहीर केल्यानंतर देशभरात सोन्याच्या दरात मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. असे असले तरी जळगावकरांना अन्य शहरांच्या तुलनेने तोळ्यामागे दीड ते दोन हजार अधिकच मोजावे लागतील. घसरणीतही जळगावात 28 हजार 300 रुपये प्रति तोळा सोने विक्री होत आहे.

अन्य जिल्ह्यांचे सोन्याचे दर
26,400 औरंगाबाद (आर.सी.बाफना)
26,500 नाशिक (आदित्य ज्वेलर्स)
27,200 सोलापूर (आपटे ज्वेलर्स)
27,500 धुळे (नाशिककर ज्वेलर्स)
28,300 जळगाव (आर.सी.बाफना)

सट्टेबाजांमुळे गोंधळ
युरोपीय देशातील संभाव्य सोने विक्रीमुळे घसरण झाली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतीय सोने बाजार स्थिर असताना केवळ सट्टेबाजांमुळे बाजारात गोंधळ निर्माण झालेला आहे.
अजय ललवाणी, शहर सराफ असोसिएशन

स्थानिक मजुरीमुळे प्रत्येक सोने बाजाराचे दर वेगवेगळे असतात. जळगावात शुद्धतेच्या ग्वाहीमुळे दर जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातच दोन दर असायचे.
सुशील बाफना, आर.सी. बाफना ज्वेलर्स

जळगावच्या व्यापार्‍यांचे असे आहे गणित
विक्रीकडे येणारे सोने बॅँकेमार्फत येते. त्यासाठी बँकिंग चार्जेस, व्हॅट, स्थानिक संस्था कर (एलबीटी), वाहतूक खर्च असा एकूण 850 रुपये भार पडून सोन्याची विक्री केली जाते.

सोन्यावर लागणारा भार (प्रति तोळा खर्च)
बँकिंग चार्जेस 300 रुपये
व्हॅट 300 रुपये
एलबीटी 75 रुपये
वाहतूक खर्च 175 रुपये