आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Gordian Minister Sanjay Savakare Comment On Suresh Jain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय गुन्हा होता या माणसाचा? पालकमंत्री सावकारेंची सुरेश जैन यांच्यावर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री संजय सावकारे प्रथमच बोलले, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असलेल्या जाहिरातीकडे लक्ष वेधत त्यांनी टीका केली. ‘काय गुन्हा होता या माणसाचा’ असा प्रश्न विचारला जात आहे, गुन्हा त्यांचा नव्हे तर काय आमचा होता? त्यांनीच गुन्हे केले म्हणून ते आज जेलमध्ये असल्याची टीका त्यांनी आमदार सुरेश जैन यांच्यावर केली.

गणेश कॉलनी प्रचारसभा झाली. यावेळी पालम्कमंत्री बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी स्थानिक परिस्थिती आणि पक्षाची भूमिका विशद केली. राजकीय व्यासपीठावरून बोलताना कधी खरे बोलले जात नाही, सर्वच आरोप-प्रत्यारोप करणारे एकत्र बसतात, एवढे टोकाचे मतभेद मग एकत्र कसे बसतात ते सर्वांनाच विचारा. जळगावमध्ये कामे झाली. परंतु वेग मंदावलेला होता असे मत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी व्यक्त केली.