आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना सोसाव्या लागताहेत यातना, लिफ्ट नादुरुस्त; हायमास्ट लॅम्पही बंबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्‍हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना वरच्या मजल्यावर घेऊन जाणाऱ्या लिफ्ट अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ६मध्ये येणाऱ्या महिलांना प्रसूतीआधीच यातना सहन कराव्या लागत आहेत. आवारात असलेले हायमास्ट लॅम्पही अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असल्याने बाहेरून येणाऱ्या रुग्णांना दाखल होण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सिव्हिलचे वायरमन पी. ई. पाटील नेहमीच गायब असल्याने इलेक्ट्रिकची कामे रखडत असल्याचेही चित्र आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाइल नाॅट रिचेबल होता.

लवकर सुरू होतील
-गेल्याआठवड्यात लिफ्ट दुरुस्त करण्यात आल्या होत्या. मात्र, काही किरकोळ कारणास्तव ‘त्या’ बंद असतील तर इलेक्ट्रिशियनला सांगून तत्काळ सुरू होतील. डॉ.िकरण पाटील, अतिरिक्त जिल्‍हा शल्यचिकित्सक

लेफ्टअसूनही उपयोग नाही
-रुग्णांनात्रास व्हायला नको, म्हणून लिफ्ट बसवल्या आहेत. मात्र, माझ्या मुलीला प्रसूतीसाठी घेऊन जात असताना जिना चढूनच जावे लागले. त्यामुळे लिफ्ट असूनही उपयोग नाही. चंद्रकांतभालेराव, रुग्णाचे वडील

रुग्णांचे स्वागत अंधारानेच
जिल्‍हारुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून इमारतीपर्यंत एकच हायमास्ट लॅम्प आहे. त्यात असलेल्या सहा लॅम्पपैकी चार वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्री बरीच मोकाट कुत्री सिव्हिलच्या आवारात फिरत असतात. अंधारात रुग्णालयात येणाऱ्यांना त्यांनी चावा घेण्याचे प्रकारातही वाढ झाली आहे.

लिफ्टचा उपयोग कधी?
सामान्य रुग्णालयातील नव्या इमारतीत लाखो रुपये खर्च करून गेल्या वर्षी दोन लिफ्ट लावलेल्या आहेत. त्यापैकी एक लिफ्ट काही दिवस सुरू होती. मात्र, त्यानंतर दोन्ही लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच असून त्याकडे वायरमनचे लक्ष नाही, वरिष्ठांच्या सूचनाही हे वायरमन पाळत नाहीत. लिफ्टमध्ये लिफ्टमन नसल्याने अनेकवेळा रुग्ण अडकल्याच्याही घटना येथे घडल्या आहेत. वॉर्ड क्रमांक प्रसूती विभाग आहे, त्या िठकाणी स्त्री रुग्णांच्या सुविधेसाठी लिफ्ट बसवलेली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या लिफ्ट बंदच आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना जिना चढून जावे लागते.