आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Government ITI Exam Issue, Police Complaint

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव आयटीआयमधील प्रताप; परीक्षेआधीच उत्तरांसह प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांच्या हाती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळण्याआधीच प्रश्न क्रमांकांसह सर्व प्रश्नांची तयार उत्तरे विद्यार्थ्यांकडे आढळून आल्यामुळे जिल्हापेठ पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या अधिक तपासात प्रश्नपत्रिका फोडणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 31 जुलैला थेअरीचा पेपर होता. या वेळी परीक्षा सुरू होण्याआधीच दोन विद्यार्थ्यांच्या खिशात उत्तरे लिहिलेले कागद आढळून आले होते. त्यानंतर चौकशी होऊन 2 ऑगस्टला प्राचार्य पी.ई.पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले. त्यानुसार सहा विद्यार्थ्यांना जिल्हापेठ पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पुढील दोन दिवसात या विद्यार्थ्यांनी नावे घेतलेल्या काही शिक्षकांचीही चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोठय़ा रॅकेटची शक्यता
केंद्रीय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआयची परीक्षा देशभरात एकाच वेळी घेतली जाते. असे असतानाही परीक्षा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांकडे प्रश्न क्रमांकांसह उत्तरे लिहिलेले कागद आढळून आल्यामुळे या प्रश्नपत्रिका फोडणारे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास होणे अपेक्षित असून, त्यात काही खासगी आयटीआयचालक सहभागी असू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. केवळ जिल्हय़ातीलच नव्हे, तर देशातील बहुतांश खासगी आयटीआय राजकीय नेते अथवा तंत्रशिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांकडून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरूनही दडपले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे.