आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या तंबीनंतरही महामार्गावरील खड्डे ‘जैसे थे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दाेन महिने उलटूनही जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजण्यात अालेली नाहीत. गेल्या अाठवड्यात पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महामार्गावरील खड्डे बुजवा किंवा ठेकेदारावर कारवाई करा, अशी तंबी दिली हाेती. दरम्यान, मंत्र्यांच्या तंबीनंतरही संबंधित ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. महामार्गावरील शहराच्या हद्दीमधील खड्डे ‘जैसे थे’ असल्याने अपघात हाेत असल्याची स्थिती अाहे.

महामार्ग चाैपदरीकरणाला उशीर हाेत असल्याने अाणि महामार्गावरील अपघात वाढल्याने महामार्ग प्राधिकरणाला केंद्र शासनाने २१ काेटींचा निधी दिला अाहे. चार महिन्यांपूर्वीच महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यात अाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दाेन ठेकेदारांमध्ये ही कामे विभागून देण्यात अाली. मात्र, तब्बल दाेन महिने उलटूनही ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. िपतृपक्षात काम करण्यास नकार देणाऱ्या ठेकेदारांनी नवरात्राेत्सवाचा मुहूूर्त साधून कामाला प्रारंभ केला. खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर-मलकापूरपासून रस्त्याचे कामदेखील सुरू करण्यात अाले हाेते. मात्र, तब्बल दीड ते दाेन महिने उलटूनही खड्डे ‘जैसे थे’ असल्याची स्थिती अाहे.
शहराच्या हद्दीतील महामार्गावर देखील रस्ता खड्ड्यांमुळे चाळणी झाला अाहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले हाेते. शहरातील खड्डे प्राधान्याने बुजवण्याचे त्यांना सांगण्यात अाले हाेते. अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची तंबी देण्यात अाली हाेती. तरीदेखील खड्डे बुजवले जात नसल्याची स्थिती अाहे.

अजिंठा चाैफुलीवर खड्डे बुजवले; इतर ठिकाणचे काय?
अजिंठा चाैफुलीवरील जीवघेणे खड्डे मनपाकडून बुजवण्यात अाले अाहेत. यामध्ये केवळ चाैकातील अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात अाली असून इतर ठिकाणी खड्डे कायम असल्याची स्थिती अाहे.

रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होतात.
महामार्गावरील कालिंकामाता मंदिराजवळ रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे.
अजिंठा चौफुली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाची झालेली अवस्था.