आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणवर शेकडोंचा रात्री साडेदहाला जमाव, खंडित वीजपुरवठ्यामुळे संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; दिवसभर गायब झालेली वीज पुन्हा रात्री दाेन तास खंडित झाल्याने वैतागलेल्या सिंधी काॅलनी, तांबापुरा, तुकारामवाडी परिसरातील दाेनशेच्यावर नागरिकांनी शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास महावितरणच्या मुख्य कार्यालयावर माेर्चा नेला. या वेळी संतप्त नागरिकांनी महावितरणपेक्षा क्राॅम्प्टन बरे, अशा घाेषणाही दिल्या. शहर पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांनी नागरिकांना समजावून घरी परत पाठवले. मात्र, यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला हाेता.
महावितरणच्या मुख्य कार्यालयापासून जवळच असलेल्या तुकारामवाडी, गणेशवाडी, दीक्षितवाडी, कासमवाडी, तांबापुरा, सिंधी काॅलनी, जाेशी काॅलनी आदी माेठ्या परिसराची वीज शनिवारी दुपारी अनेक तास बंद हाेती. रात्री पुन्हा ८.३० वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. अर्धा-पाऊण तास वाट पाहूनही वीजपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या २२३२५०६, ०७ , ०८ १४ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा फाेन करूनही काेणीच तो फाेन उचलत नव्हते. यामुळे तरुणांचा एक गट महावितरणच्या कार्यालयात पाेहोचला. त्यांना सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला.
या वेळी तरुणांनी अधिकाऱ्यांचा फाेन नंबर मागितला. ताेही मिळाल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर माेठ्या संख्येने परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. यात महिलांचेही प्रमाण माेठे हाेते. वाढता जमाव पाहून सुरक्षारक्षकांनी अभियंता पराडकर यांच्याशी संपर्क करून दिला. अधिकाऱ्यांनाही काेठे बिघाड अाहे, हे सांगता अाले नसल्याची माहिती तरुणांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

यापेक्षा तर क्रॉम्प्टन बरे होते
वीजपुरवठाखंडित झाल्याबद्दलची तक्रार करण्यासाठी तब्बल २५ वेळा फोन करूनही कोणीच उचलले नाही. येथे येऊन पाहतो तर अधिकारी नसताना कार्यालयातील एसी सुरू आहेत. यापेक्षा क्रॉम्प्टनची सेवा चांगली होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गिरीशमोतीरामाणी, वीजग्राहक