आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजीत जळगावला सुवर्ण, रौप्यपदक : विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाशिकयेथे झालेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सुवर्ण रौप्यपदक पटकावून वर्चस्व प्रस्थापित केले.
नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धा झाल्या. यात जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी झाला होता. जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापक म्हणून हरीश साळुंखे, संघ प्रमुख म्हणून राष्ट्रीय खेळाडू दीक्षांत जाधव यांचा समावेश होता. यात जिल्ह्याच्या संघाने चुरशीने लढत देत वर्चस्व राखले. सुवर्ण रौप्यपदक प्राप्त खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, संस्थेचे अध्यक्ष मिलवाणी, प्रशिक्षक दिलीप गवळी, सुनील पालवे, प्रा. यशवंत सैंदाणे, प्रा. विनोद कोचुरे, विलास जुनागडे यांनी गौरव केला.

विजयी खेळाडू
१७७पीप साइट एअर रायफल १० मीटर १९ वर्षे वयोगट मुले- प्रथमनिखिल पाटील, द्वितीय पीयूष सपकाळे (मू.जे.महाविद्यालय), १४वर्षे वयोगट मुले- प्रथमकृष्णा भाटिया (सेंट जोसेफ हायस्कूल), ओपनसाइट १९ वर्षे वयोगट मुली- प्रथमसंध्या गवळी (बेंडाळे महाविद्यालय), द्वितीय भायश्री धनगर (सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय), १४वर्षे वयोगट मुली- द्वितीयतनया राव (काशिनाथ पलोड स्कूल), ओपनसाइट १९ वर्षे वयोगट मुले- प्रथमसौरभ गवळी (नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय), १७वर्षे वयोगट मुले- द्वितीयशुभम गवळी (ला.ना.विद्यालय), १४वर्षे वयोगट मुले- प्रथमवरुण सपकाळे (आर.आर.विद्यालय), एअरपिस्तुल १० वर्षे वयोगट मुली- प्रथमकुंजली जाधव ( मू.जे.महाविद्यालय), १४वर्षे वयोगट- प्रथमदेवयानी सपकाळे (नंदिनीबाई विद्यालय).