आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रशासनाच्या चुकीमुळे रद्द; आत्महत्येसाठी विद्यार्थी जलकुंभावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दोन महिन्यांपूर्वी निश्चित झालेला वेल्डर शाखेतील प्रवेश रद्द झाल्याच्या कारणावरून शासकीय आयटीआयचा विद्यार्थी दिनेश जानकीराम सपकाळे (वय 15) याने सोमवारी सकाळी 11.30 वाजता 40 फूट उंचीच्या जलकुंभावर चढून आत्महत्या करण्याचा प्रय} केला. 15 मिनिटे चाललेला हा थरार आयटीआयचे प्राचार्य, पोलिस आणि दिनेशच्या मित्राने आटोक्यात आणला. मात्र, त्या विद्यार्थ्याची मागणी अपूर्णच राहिली. प्रशासनाने केलेली चूक सुधारण्याचे औदार्य न दाखवल्यामुळे त्याच्यावर असे अघोरी कृत्य करण्याची वेळ आली.

दिनेशने आयटीआयच्या वेल्डर शाखेत 29 जुलैला प्रवेश घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून तो वेल्डरचा अभ्यासक्रम करीत आहे. अचानक त्याला 16 सप्टेंबर रोजी प्राचार्य व्ही.एम.राजपूत यांनी प्रवेश रद्द झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून दिनेशने प्रवेशासंदर्भात नाशिक कार्यालयात संपर्क साधून काय अडचण आली आहे? याबाबत चौकशी केली. या चौकशीत आयटीआयमधून प्रवेश प्रक्रियेत ‘सॉफ्टवेअर एरर’ आल्याचे उत्तर त्याला मिळाले. याबाबत माहिती विचारण्यासाठी तो सोमवारी प्राचार्यांकडे गेला असता, प्राचार्यांनी त्याला अपमानास्पद वागणूक दिली, असे दिनेशचे म्हणणे आहे. तसेच आता तुला सुतारकाम या शाखेत वर्ग करण्यात येत असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. आपल्या गुणवत्तेनुसार दिनेशला वेल्डरच्या शाखेत प्रवेश मिळाला होता. आयटीआयच्या अडचणीमुळे त्याला भुर्दंड बसत आहे, असे त्याच्या लक्षात आल्यावर सोमवारी दिनेशने आपली मागणी मान्य करण्यासाठी आयटीआय परिसरातील 35 ते 40 फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढून उडी घेण्याची धमकी दिली. दरम्यान त्याचा मित्र नीलेश भंगाळे याने मध्यस्थी करीत त्याला खाली उतरवले.

काय चूक झाली?

दिनेशच्या प्रवेश अर्जातील अँडमिशन ग्रॅण्ड नोट ब्लॅक जनरेट झाल्यामुळे त्याचे अँडमिशन रद्द ठरले आहे.