आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपमहानिरीक्षकांकडून जळगाव कारागृहाची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नाशिक येथील कारागृह उपपोलिस महानिरीक्षक जयंत नाईक यांनी शनिवारी अचानक जळगावच्या उपकारागृहात येऊन तपासणी केली. कैद्यांची संख्या, भोजन, कारागृहाची सुरक्षा या संदर्भात त्यांनी चौकशी केली. गेल्या १५ दिवसांपूर्वी नागपूर येथील कारागृहातून कैदी पळून गेले होते.
त्यानंतर कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांनी राज्यातील सर्व कारागृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जळगाव कारागृहाची तपासणी झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, नाईक यांच्याशी संपर्क केला असता, कारागृहाची ही रुटीन तपासणी होती, असा दावा त्यांनी केला. तपासणीत काय अाढळले हे गुलदस्त्यात अाहे.