आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Jain Industries Founder Bhavarlal Jain Died In Mumbai

जैन उद्याेग समूहाचे संस्थापक पद्मश्री डाॅ.भवरलाल जैन यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जैन उद्याेग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डाॅ.भवरलाल जैन यांचे गुुरुवारी मंुबईतील जसलाेक रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७८ वर्षांचे हाेते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.

त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ८ आणि शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत जैन हिल्स येथील आकाश मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ११ च्या सुमारास त्यांचे पार्थिव जैन हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी नेले जाईल. त्यानंतर ज्या शेतात विविध प्रयोग करून नावीन्याचा मंत्र त्यांनी दिला त्या जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक भूमीवर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. डाॅ. भवरलाल जैन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे १४ फेब्रुवारी राेजी विशेष विमानाने जळगावहून मुंबईत हलविण्यात अाले हाेते. जसलाेक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. त्यांना अायसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अाले हाेते, २५ फेब्रुवारी राेजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

या वेळी देव जिंकला, अाम्ही हरलाे, अशी प्रतिक्रिया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांकडून देण्यात अाली. यापूर्वी २७ जानेवारी राेजी व्हर्टिगाेचा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात अाले हाेते. त्यांच्या पश्चात जैन उद्याेग उद्याेग समूहाचे उपाध्यक्ष अशाेक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अतुल जैन, अजित जैन, सुना, नातवंडे असा परिवार अाहे. ७८ वर्षांच्या वाटचालीत त्यांनी साधी राहणी आणि निसर्गपूरक जीवनशैलीच्या माध्यमातून तब्बल १० वेळा हृदयविकाराच्या आघाताला परतवून लावले होते. शनिवारी जैन इरिगेशनच्या भारतातील सर्व आस्थापना बंद राहतील. याचबरोबर गांधीतीर्थ येथील गांधी म्युझियमही शनिवारी बंद असेल.
जैन उद्योग समुहाची स्थापना...
भंवरलाल जैन यांनी 1963 मध्ये जैन उद्योग समुहाची स्थापना केली. भंवरलाल जैन हे लेखकही होते. मराठी, इंग्रजी भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही जैन यांचा दांडगा अभ्यास होता. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 1997 मध्ये जैन यांना प्रतिष्ठेच्या 'क्रॉफोर्ड रीड मेमोरीयल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमेरिकन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती होत. भंवरलाल जैन यांनी 1980 मध्ये पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी सुरु केली. इतकेच नव्हे तर 90 च्या दशकात त्यांची संपूर्ण भारतात सूक्ष्म जलसिंचनाची संकल्पना रुजवली. जैन उद्योग समुह 116 देशात विस्तारीत झाला असून सहा हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल आहे.

पुढील स्लाइडवर डाॅ.भवरलाल जैन यांचा परिचय आणि त्यांनी प्राप्त केलेले पुरस्कार, पाहा भवरलाल जैन यांचे काही निवडक फोटोज...