आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Jdcc Bank Manager Complaint For Trees Cutting At Corporation Area

जेडीसीसी मॅनेजर, गुरुद्वारा अध्यक्षांविरुद्ध वृक्षतोडीचा गुन्हा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: महापालिका हद्दीतील वृक्षतोडप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील वृक्षतोडप्रकरणी ‘दिव्य मराठी’ ने जनजागृती करीत याबाबत सचित्र वृत्त दिल्याने अखेर महापालिका प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात झाली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या आवारात अशोक वृक्षाची कत्तल करण्यात आली होती. याप्रकरणी महापालिकेच्या वृक्ष अधिकार्‍यांतर्फे पंचनामा करण्यात आला होता. गुरुद्वाराच्या आवारातही वॉल कंपाऊंड दुरुस्तीदरम्यान एका वृक्षाची कत्तल करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये विनापरवानी वृक्ष तोडल्याने महापालिकेचे वृक्ष अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शुक्रवारी रात्री अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.