आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांसह अधिकार्‍यांच्या घरी राबतात कामगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेचे काही नगरसेवक आणि अधिकारी सफाई कर्मचार्‍यांकडून घरची कामे करून घेत असल्याचा आरोप आंदोलन करणार्‍या सफाई कामगारांनी केला आहे. तसेच ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांचे पगार थांबवण्यात आले आहेत. ते देण्यात यावे यासह घरी कामास बोलावणार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विजय निकम यांनी केली आहे. दरम्यान, मंगळवारी साफसफाईचे काम बंद ठेवण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
मक्तेदाराच्या वतीने काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना पगार देण्यात आलेले नाहीत. हा प्रकार वारंवार होत असल्यामुळे यापूर्वी काम बंद आंदोलन करणार्‍या कामगारांनी सोमवारी पालिका गाठत ठिय्या आंदोलन केले. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्याशी आंदोलकांच्या वतीने विजय निकम यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे मक्तेदाराच्या सफाई कर्मचार्‍यांना अधिकारी किंवा नगरसेवक घरी काम करण्यास भाग पाडतात व विरोध करणार्‍या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात येते. त्याचप्रमाणे काम करूनही मक्तेदार वेळेवर पगार देत नाही अशा तक्रारी आरोग्य अधिकार्‍यांसमोर मांडण्यात आल्या.