आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपमहापौरपदावर भाजपचा डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उपमहापौर राखी सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर शहर विकास आघाडीचे अनिल वाणी यांना संधी देण्याचे ठरलेले आहे. दरम्यान, ही निवड बिनविरोध होऊ न देता पालिकेतील अस्थिर वातावरणाचा फायदा घेत, उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे नशीब आजमावले जात आहे. त्यामुळे सोमवारी भाजपतर्फे विजय गेही यांचा अर्ज भरण्यातआला आहे.

अर्ज सादर करण्याची सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत शहर विकास आघाडीतर्फे अनिल वाणी यांचे दोन अर्ज दाखल झाले. त्यांना रमेश जैन, श्यामकांत सोनवणे सूचक, तर सुनील महाजन व प्रशांत पाटील अनुमोदक होते. तसेच भाजपतर्फे विजय गेही यांनीही अर्ज दाखल केला. त्यांना सुरेश भोळे सूचक व अशोक लाडवंजारी अनुमोदक होते.

अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न

घरकुल प्रकरणामुळे खान्देश विकास आघाडीचे प्रदीप रायसोनी, सदाशिव ढेकळे व अशोक सपकाळे अडचणीत आले आहेत. तसेच प्रशांत सपकाळे खूनप्रकरणी शहर विकास आघाडीचे नेते कैलास सोनवणे हद्दपार आहेत. त्यामुळे सध्या सभागृहात सत्ताधारी गटाकडे 36 व विरोधकांकडे 25 मते असली तरी, या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्षांच्या सहकार्याने उपमहापौरपद आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रय} भाजप करणार आहे.