आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा स्वीकारले, पाच जणांच्या पत्नी आल्या सभागृहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळालेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाग्य अजमावणार्‍या विद्यमान 39 नगरसेवकांपैकी तब्बल 25 जणांना जनतेचा पुन्हा कौल मिळाला आहे. तर 14 जणांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच आजी-माजी पाच नगरसेवकांच्या धर्मपत्नी यापुढे सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत.

अशी आहे आकडेवारी : पराभूत झालेल्यांमध्ये खाविआ 6, भाजप 2, राष्ट्रवादी 3, अपक्ष 2 तर मनसेच्या एका नगरसेवकांचा तर विजयी झालेल्यांमध्ये खाविआ 16, मनसे 3, मविआ 1, भाजपचे 5 नगरसेवकांचा समावेश आहे.

यांना नाकारले : हर्षा सांगोरे, सरिता सपकाळे, दिलीप बावीस्कर, प्रतिभा देशमुख, मंगलसिंग पाटील, किशोर भाऊलाल चौधरी, मीनाक्षी सरोदे, माजी महापौर जयर्शी धांडे, आशाबाई शांताराम सूर्यवंशी, भारती अजय जाधव, पुष्पा प्रकाश पाटील, अशोक लाडवंजारी, इब्राहिम मुसा पटेल, लीला रमेश सोनवणे यांचा समावेश आहे.

कोणाला मिळाला पुन्हा कौल

मिलिंद कोंडू सपकाळे, गणेश बुधो सोनवणे, राखी शामकांत सोनवणे, नितीन लढ्ढा, वर्षा नारायण खडके, शामकांत बळीराम सोनवणे, डॉ. अश्विन सोनवणे, जयर्शी नितीन पाटील, ज्योती शैलेंद्र इंगळे, ललित कोल्हे, सिंधू कोल्हे, सुरेश भोळे, नरेंद्र भास्कर पाटील, भारती कैलास सोनवणे, रमेश जैन, वामनराव खडके, विष्णू भंगाळे, विजय गेही, सदाशिव ढेकळे, सुनील महाजन, सुभद्रा नाईक, इक्बालोद्दीन पिरजादे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, नितीन बरडे यांचा विजय झाला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, लाठीचार्जला कार्यकर्त्यांनी दिले दगडफेकीतून उत्तर..