आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - खान्देश विकास आघाडीला कोणता पक्ष पाठबळ देईल, याची राजकीय चर्चा रंगत असताना कोणाचाही पाठिंबा न मागण्याचा निर्णय आघाडीने घेतल्याचे वृत्त आहे. महापौर निवडीच्यावेळी ‘चमत्कार’ घडविण्याचे नियोजन आघाडीचे नेते करीत आहेत.
महापालिकेत पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे खान्देश विकास आघाडीला किमान तीन मतांची जुळवाजुळव करावी लागते आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेण्याशिवाय आघाडीला पर्याय नाही. त्यामुळे कोणता पक्ष मदत करेल, याविषयी उत्सुकता वाढली आहे. त्या मदतीच्या बदल्यात काय अटी घातल्या जाऊ शकतात याविषयीही चर्चा रंगत आहेत. मात्र, स्वत:हून कोणत्याही पक्षाची मदत मागायची नाही असा निर्णय आघाडीने घेतला आहे. आघाडीचे एक नेते नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, कोणी स्वत:च मदत करायला समोर आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू; पण कोणाकडे मदत मागणार नाही. महापौरपदाच्या निवडीच्या वेळी आमच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होईल आणि त्या निवडूनही येतील याची आम्हाला खात्री आहे.
कोणत्याही पक्षाला मदत मागितली तर तो पक्ष अटी टाकून पदे मागेल. तसे करण्यापेक्षा आघडीला नगरसेवक आपल्याकडे वळविणे अधिक सोयीचे वाटत असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.