आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकाची ‘जनक्रांती’ गळ्यात मनसेचा पट्टा, ठाकरेंकडून झालेल्या सत्काराचे ‘राज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राजकारणात केव्हा काय घडेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही,हे तेवढेच खरे आहे. कारण जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदार मनीष जैन यांच्या जनक्रांती पक्षाच्या दोन्ही नगरसेवकांनी नाशिक येथे जाऊन राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेचा पट्टा गळ्यात टाकून घेतला. जनक्रांतीच्या नगरसेवकांची ही कृती गृहीत धरून सत्ताकारणाची गणित मांडणार्‍यांना त्यांनी गोंधळात टाकले आहे.

जळगाव मनपात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा आमदार सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला स्थान मिळाले आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपने सत्तेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उरलेल्या राष्ट्रवादी व मनसेच्या भूमिकेवर खाविआच्या सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

खाविआचे 33 नगरसेवक तसेच आमदार मनीष जैन यांच्या जनक्रांतीकडून विजयी झालेले 2 नगरसेवक असे 35 संख्याबळ गणले जात आहे. मात्र इकडे जनक्रांतीचे नगरसेवक सुनील चुडामण पाटील व सुमित्रा वासुदेव सोनवणे हे दोन दिवसांपासून मनसेच्या नगरसेवकांसोबत नाशिकची वारी करून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला. यावेळी जनक्रांतीचे दोघा नगरसेवकांनीही सत्कार स्वीकारला. या नगरसेवकांनी केवळ सत्कार स्वीकारला नाही तर थेट मनसेचा पट्टाच गळ्यात घातला. एका पक्षाची उमेदवारी असताना थेट दुसर्‍या पक्षाचे चिन्ह असलेला पट्टा गळ्यात घालण्यामागे नेमके काय कारण असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राज ठाकरेंच्या उपस्थितीत दोघांनी मनसेला स्वीकारले तर नाही ना? अशीही चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे खाविआ ते दोघे आपल्या सोबत असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मनसेकडून सत्क ार स्वीकारण्यामागे नेमके राजकारण काय याचा धुरिणांकडून शोध घेतला जात आहे.

आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटत आहोत. त्यांनी केलेला सत्कारही स्वीकारत आहोत. तथापि, मनपावर ज्यांची सत्ता राहील, त्यांच्यासोबत आम्ही राहाणार आहोत. अर्थात, अंतिम निर्णय हा आमदार मनीष जैनच घेतील. सुनील चुडामण पाटील, नगरसेवक, जनक्रांती