आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon JMC School New Project For Younger Boys And Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनव उपक्रम: आता विद्यार्थ्यांना मिळणार लैंगिक शिक्षणाचे धडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका हद्दीतील कुमारवयीन विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण मिळण्यासाठी छत्रपती शाहू रुग्णालयात स्वतंत्र लायब्ररी उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यापासून लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली पुस्तके खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शासनातर्फे किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षण मिळावे. त्यांच्या प्रजनन आणि लैंगिक समस्येसंदर्भात माहिती मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अश्र क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाचे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत नंदिनीबाई, महाराणा प्रताप, काशीबाई कोल्हे, अँग्लो उर्दू या विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच्या पुढचे पाऊल म्हणजे शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे मिळावे यासाठी शासनमान्य पुस्तकांची लायब्ररी सुरू करण्यात येत आहे. छत्रपती शाहू रुग्णालयात सुरू होणार्‍या या लायब्ररीसाठी पुस्तकांची खरेदी सुरू झाली आहे. अजून काही पुस्तके मागविण्यात आली असून एप्रिल महिन्यापासून ही लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.

मुलगी वयात येताना
विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या लैंगिक शिक्षण लायब्ररीत विविध डॉक्टरांनी लिहिलेली ‘मुलगी वयात येतांना, मुग्धा मधूर, हे सारे मला माहीत हवे, काय सांगू कसं सांगू, काय तुझ्या मनात, हितगुज लेकीशी’ ही पुस्तके दाखल झाली आहेत.

पुस्तकांची खरेदी
किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शिक्षणात भर पडण्यासाठी शासनातर्फे मान्यता देण्यात आलेल्या पुस्तकांची पुणे व मुंबई येथून खरेदी करण्यात येत आहे. रुग्णालयातील एका कक्षात ही लायब्ररी सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे. डॉ.निर्मला शर्मा, प्रमुख वैद्यकीय अधिकारी

अश्र क्लिनिकतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
महापालिका प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या अश्र क्लिनिकतर्फे किशोरवयीन मुलांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी किशोरी, माझी आई माझी सखी, आमचे मित्र मंडळ, डॉक्टर मित्र हवा, अवघड वयाचा सूर्योदय, आरशातील प्रतिबिंब’असे विषय देण्यात आले होते. यात शहरातील 750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे अश्र क्लिनिकच्या पालिका पदाधिकार्‍यांनी सांगितले.